Bramhanad Sangeet Mahavidyalaya
ईश्वर प्राप्तीचा मार्ग संगीत साधनेतून जातो, असं मानंल जातं संगीत साधनेमुळे ईश्वरप्राप्ती होते की नाही, हा कदाचित स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकेल, पण संगीत साधनेतून चित्त शांती निश्चित मिळते, स्वतःबरोबरच इतरांच्या ही आयुष्यात नंदनंवन फुलवण्याचे काम उत्तम संगीत करतं. आनंदाचे अखंड निर्झर प्रवाहित ठेवण्याचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वाटा फार मोलाचा आहे, या अस्सल शास्त्रीय गायकीचे जतन, संवर्धन करण्यासाठी अनेक व्यक्ती-संस्थानी मोठं योगदान दिलं आहे. ‘ब्रम्हनाद’ ही यापैकीच एक संस्था, गेली 14 वर्षेविविध उपक्रम–कार्यक्रमातून संगीत, आराधना करत रसिकरंजन करत आहे.
संगीताच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱे विविध व्यक्ती, रसिक, कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रम्हनाद संगीत विदयालयातर्फे दरवर्षी विविध ब्रम्हनाद पुरस्कार दिला जातो. गेल्या 8 वर्षात विविध 14 कलावंत, रसिकांना या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. कोणतीही कला केवळ स्वतःपुरती किंवा विशिष्ट वर्गापुर्ती मर्यादित न राहता सर्व समाजाला तिचा लाभ व्हावा, या माध्यमातुन समाजसेवा घडावी हा ब्रम्हनादचा हेतू आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील होतकरू कलाकरांसाठी गायन, नृत्य वादनाचे कार्यक्रम, कार्यशाळा घेण्याचा उपक्रम ‘ब्रम्हनाद’ ने चालवला आहे.
शास्त्रीय गायन शिकण्याची इच्छा अनेकांना असते, पण वेगवगळया करणाने ते शक्य होत नाही. या मध्ये आर्थिक परिस्थिती हेच कारण अनेकदा ठळकपणाने जाणवतं, शास्त्रीय संगीत शिकू इच्छिणारे अशा होतकरू, गरजू अशा ग्रामीण भागातील विदयार्थ्या साठी सांगितिक शिष्यवृत्ती सुरू करून ब्रम्हनाद ने ग्रामीण भागातील शास्त्रीय संगीत प्रसाराला उत्तेजन दिलं आहे.
विविध मानसिक-शारिरिक आजारांवर संगीत हा उत्तम उपचार आहे, हे अनेकदा सिध्द झालं. हा विचार जनमानसामध्ये रूजवण्याच्या दृष्टीने आणि त्यासाठी संशोधनाच्या दिशेने ब्रम्हनाद संगीत विदयालय कार्य करत आहे संस्थेच्या विविध उध्दिष्टांपैकी हे एक महत्वाचे उध्दिष्ट आहे.
त्याच बरोबर वारकरी संप्रदायासाठी सांप्रदायिक भजन प्रवचन, किर्तन, पखवाज आणि शास्त्रीय संगीतासाठी कार्यशाळा भरवणं हे संस्थेचं उध्दिष्ट आहे. नवोदित कलाकारांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, संगीतासाठी वाहून घेतलेल्या पण वृध्दत्वात हलाखीचे दिवस काढणारया कलावंतासाठी समाजाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणे संस्थेची ही आणखी काही महत्तवाची उध्दिष्ट आहेत.
आवाहनः
संस्थेला या पेक्षाही मोठा पल्ला गाठायचा आहे त्या दृष्टीने समाजातील प्रत्येकाचे मदतीचे हात अपेक्षित आहेत. संस्थेला तंबोरा, हार्मोनियम, तबला अशी संगितिक साधनं उपलब्ध करून देणं, एखादया कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारणं, एक किंवा त्याहुन अधिक विदयार्थ्याचा संगीत शिक्षणाचा आर्थिक भार उचलणं, संस्थेचे आजीव सभासदत्व स्वीकारणं, होतकरू विदयार्थी, वृध्द कलावंताची माहिती मिळवणं अशा विविध माध्यमातून आपण ही मदत करू शकता समाजातील प्रत्येकांच्या सहभातून ब्रम्हनाद ची मैफल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे.
संपर्कः
सौ रागीणी गरूड
मोबः 9689144405